
DMER MERIT LIST 2023
वैद्यकीय शिक्षण व संशोधन व महाराष्ट्र शासन विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये स्टाफ नर्स 2023 या पदासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे या विभागांमध्ये ज्या उमेदवाराची DMER MERIT LIST 2023 लागली आहे आशा उमेदवारांसाठी न्यायालय प्राधिकरणाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिलेला असून हा निकाल भविष्यात देखील अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपणा सर्वांना माहिती आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाची परीक्षा टाटा कंपनीने घेतली होती आणि त्या कंपनीचे काही नियम आहेत त्या अंतर्गत नॉर्मलायझेशन हा एक मुद्दा उपस्थित करून काही उमेदवारांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती यावर न्यायालयाने उचित निर्णय दिलेला असून या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन हा मुद्दा एक सर्वसाधारण प्रक्रिया असून ही प्रक्रिया नवीन नाही आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून चांगले आहे.असा निर्वाळा न्यायालयाने दिलेला असून ज्या उमेदवारांची या परीक्षेमध्ये निवड झालेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळालेला आहे लवकरच या भरती बाबतची पुढील प्रक्रिया सुरू केल्या जाईल कागदपत्रे तपासणी आणि नियुक्तीपत्र देखील लवकरात लवकर उमेदवारांना मिळणार आहेत.
DMER MERIT LIST 2023 लागल्यानंतर याचिका का करण्यात आली
नॉर्मलायजेशन पद्धत हितकारक आणि योग्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय
उर्वरीत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टाकडून हिरवा कंदील .दिला आहे.DMER MERIT LIST 2023 लावली आहे. विभाग लवकरच उर्वरीत प्रक्रिया पूर्ण करेल- परिक्षार्थी आणि पालक वर्गाला विश्वास मिळाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन(डीएमईआर) विभागांतर्गत स्टाफ नर्स (अधीपरिचारिका ) पदासाठी दिनांक १९ आणि २० जून रोजी टीसीएस या संस्थेमार्फत विविध सत्रामध्ये परिक्षा घेण्यात आली होती .DMER MERIT LIST 2023 लागली आहे उमेदवार संख्या जास्त असल्या कारणांनी परिक्षा सलग 2 दिवस 6 वेगवेगळ्या सत्रामध्ये मध्ये घेण्यात आली होती.ज्या वेळी एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परिक्षा घेण्यात येते तेव्हा TCS संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये सदरील संस्था वापरत असलेली नॉर्मलायजेशन पद्धत ही एक नियमित , हितकारक आणि वैध प्रक्रिया असते
नॉर्मलायजेशन म्हणजे काय
आणि नॉर्मलायजेशन पद्धतीमध्ये सर्व सत्रातील प्रश्नपत्रिका यातील काठिण्य पातळी तपासून पाहूनच ही पद्धत अमलात आणली जाते.. त्यामूळे सर्व सत्रातील विद्यार्थी एका समान स्थरा वर येतात आणि सर्वांना गुणवत्ता यादीत समान न्याय दिला जातो आणि कुठलीही गुणवत्ता डावलली जात नाही .. सदरील नॉर्मलायजेशन पद्धत वापरून देण्यात आलेले कमी आणि जास्त गुण हे प्रश्न पत्रिकाची काठिण्य पातळी तपासूनच दिलेले असतात.. यापूर्वी पण टीसीएस संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या सर्व परीक्षे मध्ये नॉर्मलाजेशन पद्धत वापरण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीतील जीआर पण काढलेले आहेत.
टीसीएस संस्थे मार्फत घेण्यात आलेली डीएमईआर परीक्षा घेण्यापूर्वी नॉर्मलाजेशन बाबतीतील सूत्र आणि त्याची माहिती ६ जून रोजी डीएमईआर संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली होती आणि ती माहिती सर्व परिक्षार्थी यांनी पाहिली होती आणि नंतरच १९ आणि २० जुन रोजी परिक्षा दिली होती. परीक्षेच्या संधर्भात सर्व नियम व अटी आणि त्या बाबतीत संकेत स्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात माहिती हे सर्व पाहून आणि मान्य करूनच परिक्षार्थी यांनी परीक्षा देखील दिली होती..
स्टाफ नर्स न्यायालयाचा निकाल 2023
.DMER MERIT LIST 2023 लागली आहे .पण काही परीक्षार्थींनी नॉर्मलाजेशन विरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरण छ्त्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे याचिका दाखल केली होती.याचिकेची अंतिम सुनावणी दि. २७ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडली..डीएमईआर व टीसीएस विभागाकडून नॉर्मलाजेशन पद्धत कश्याप्रकारे योग्य व हितकारक आहे या बाबतीतील सर्व पुरावे व महत्त्वपूर्ण जीआर कोर्टासमोर सादर करण्यात आले तसेच याचिका दाखल केलेल्या ४ पैकी ३ परिक्षार्थी यांना देखील नॉर्मलाजेशन मुळे गुण वाढवून देण्यात आले होते आणि कोणावरही अन्याय झाला नाही हे देखील सांगण्यात आले.. सर्व पुरावे आणि महत्वपूर्ण जीआर तपासून पाहिल्यानंतर नॉर्मलाजेशन ही पध्दत योग्य आणि विद्यार्थी हितकारक असल्याचा महत्वपूर्ण निकाल कोर्टाकडून देण्यात आला
न्यायालयाने निकाल दिला आता पुढे काय
तसेच उर्वरीत DMER MERIT LIST 2023 जाहीर झाली असून पुढील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोर्टाकडून हिरवा कंदील देखील देण्यात आला. दि.८ सप्टेंबर रोजी डीएमईआर या विभागाने या बाबतीतील प्रोविजनल मेरिट लिस्ट संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली होती पण त्यानंतर या भरती प्रक्रियेमधील पुढील टप्पा कागद पडताळणी करणे या
बाबतीतील कुठलीही माहिती अजुन पर्यंत डीएमईआर विभागाने संकेत स्थळावर उपलब्ध करून दिली नव्हती.पण आता कोर्टाकडून उर्वरीत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हिरवा कंदील मिळाला असल्यामुळे डीएमईआर विभाग पद भरती प्रक्रियेमधील पुढील टप्पा कागद पडताळणी लवकरात लवकर करून आणि उर्वरित प्रक्रिया पार पाडून ही पद भरती पुर्ण करेल असा विश्वास परिक्षार्थीना आहे.. लवकरच या बाबतीतील माहिती संकेस्थळावर डीएमईआर विभाग उपलब्ध करुन देईल अशी आशा संबधित परिक्षार्थी आणि पालक वर्गाकडून बाळगली जात आहे. डीएमईआर विभाग लवकरच या वरती विचार करून पुढील प्रक्रिया लवकरच सुरू करेल असा विश्वास देखील परिक्षार्थी आणि पालकवर्गाला आहे.

[…] DMER MERIT LIST 2023 […]
Tell me details